रोटरी, इनरव्हील, रोटरॅक्टचा पदग्रहण सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:46 IST2019-07-01T00:45:31+5:302019-07-01T00:46:18+5:30
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने कायम आशावादी जीवन जगावे, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता लेले यांनी केले.

रोटरी, इनरव्हील, रोटरॅक्टचा पदग्रहण सोहळा उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने कायम आशावादी जीवन जगावे, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता लेले यांनी केले.
रोटरी क्लब आॅफ जालना सेंन्ट्रलचा पदग्रहण समारंभ नुकताच मधुर बँक्वेट येथे उत्साहात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. स्मिता लेले, रोटरीचे उपप्रांतपाल भरत जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नूतन अध्यक्ष वीरेंद्र देशपांडे, सचिव विवेक मेहता यांनी मावळते अध्यक्ष डॉ. स्वप्नील बडजाते यांच्याकडून पदभार स्वीकारला. लेले म्हणाल्या, आपल्याला आयुष्यात ज्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्या अडचणींची इतरांना झळ बसू नये, यासाठी माणसाने प्रयत्नशील राहावे, असेही त्या म्हणाल्या.
नूतन अध्यक्ष वीरेंद्र देशपांडे यांनी नवीन कार्यकारिणी समितीची ओळख करुन दिली. मावळते अध्यक्ष डॉ. स्वप्नील बडजाते आणि सचिव सागर कावना यांनी केलेल्या कामाचा आढावा सदर केला. इनरव्हील सेन्ट्रलच्या नूतन अध्यक्षा संगीता मोतीवाला तसेच सचिव ममता पंजाबी यांनी आपल्या नूतन कार्यकारिणीसह पदभार स्वीकारला. मावळत्या अध्यक्ष स्मिता जैन यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरॅक्ट सेन्ट्रलचे नूतन अध्यक्ष पीयूष गादिया आणि सचिव मयुरी लड्डा यांनी पदभार स्वीकारला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अभय सोनी आणि डॉ. सोनाली जेथलिया यांनी केले.