शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

जालना जिल्हा कारागृहाचा मार्ग खडतर, पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:21 IST

राज्य शासनाने तब्बल २१ कोटी ४२ लाख रुपये खर्च करुन इंदेवाडी परिसरात सुसज्य जिल्हा कारागृहाची उभारणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने तब्बल २१ कोटी ४२ लाख रुपये खर्च करुन इंदेवाडी परिसरात सुसज्य जिल्हा कारागृहाची उभारणी केली आहे. मात्र कारागृहाकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने पोलीस कर्मचा-यांची गैरसोय होत आहे. गेल्या सहा वर्षापासून शासनाकडे रस्त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.अंबड मार्गावर असलेल्या इंदेवाडी परिसरातील ७५ एकर जागेवर जिल्हा कारागृहाची उभारणी करण्यात आली आहे. १ डिसेंबर २९१४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एस.आर नायक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. सध्या स्थितीत कारागृहात ६०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे. कारागृहात प्रशासकीय इमारत, जनरल बरॅक, कीचन बरॅक, दवाखाना, कार्यशाळा इमारत, तब्बल ७५ पोलीस कर्मचा-यांचे निवासस्थाने , अतिसुरक्षा भिंत प्रतीक्षा कक्ष बाहेरील आवार आदी उभारण्यात आले आहेत. मात्र कारागृहाकडे जाणारा मार्ग अद्यापही पक्का झाला नसल्याने पोलिसांना कारागृहापर्यंत कैद्यांना नेताना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.पावसाच्या दिवसात तर दोन किमी चिखल तुडवत धोकादायक रीत्या कैद्यांना न्यावे लागते. यात कैदी पळून जाण्याची भीती असल्याचे अनेकदा पोलिसांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सलग सहा वर्षापासून जिल्हा नियोजन समितीसमोर कारागृहाच्या रस्त्याचा विषय मांडण्यात येत आहे. मात्र याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. येथील पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीय, कैद्याना भेटण्यास येणाºया नातेवाईकांना सुध्दा रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.राज्यातील जुन्या कारागृहाची डागडुजी, संरक्षण भिंत, बराकीची सुरक्षिता इ. देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाने सोमवारी ९ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. असे असताना जालना येथील जिल्हा कारागृहाचा रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होण्यास अडचणी येत आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :jailतुरुंगroad transportरस्ते वाहतूकPoliceपोलिस