स्वरानंदवन कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:33 IST2018-12-21T00:32:46+5:302018-12-21T00:33:45+5:30
ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्वरानंदवन कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते.

स्वरानंदवन कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्वरानंदवन कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या क्रार्यक्रमात अंध, अपंग, कर्णबधिर दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या विविध नृत्यासह देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेवती मांटे, स्वरानंदवनचे सदाशिव ताजणे, समाजकल्याण सहायक आयुक्त बलभीम शिंदे, डॉ.सुखदेव मांटे, माजी प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल, माजी उपप्राचार्य हरकिशन मुंदडा, डॉ.शिवाजी मदन यांची प्रमुख उपस्थिती होती.
महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवन येथील दिव्यांग कलाकारांनी दोन तास विविध गीते व नृत्य सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. तसेच देशभक्तीपर गीते सादर करुन दिव्यांग कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी प्रा. बसवराज कोरे, डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. नारायण बोराडे, डॉ. शशिकांत पाटील, प्राचार्य राजाराम डोईफोडे, माजी प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. यशवंत सोनुने, प्रा. रमेश भुतेकर, डॉ. अर्चना काबरा, डॉ. अशोक काबरा आदीची उपस्थिती होती.