चितळी-पुतळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:09+5:302021-05-20T04:32:09+5:30
गावातील १८ ते ४४ वयाेगटातील सर्वांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील लोकांचे पहिल्या डोसचे लसीकरण जवळपास ९० ...

चितळी-पुतळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक
गावातील १८ ते ४४ वयाेगटातील सर्वांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील लोकांचे पहिल्या डोसचे लसीकरण जवळपास ९० टक्के झाले. गावात दर आठवड्याला हायड्रोक्लोराईड फवारणी केली जात आहे. आजपर्यंत तीनवेळा जंतुनाशक फवारणी झाली आहे. गावातील दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत योग्य काळजी घेऊन उघडावीत आणि इतर वेळेत बंद ठेवावीत व कुणालाही ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी थकवा जाणवल्यास आजार अंगावर न काढता तत्काळ उपचार घेणे. कोणतीही भीती न बाळगता पूर्ण चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, केवळ कामानिमित्त घराबाहेर पडावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही सांगितले आहे. दरम्यान, दर सोमवारी नियमित आढावा बैठक घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. चितळी-पुतळी गाव लवकरच कोरोनामुक्त होईल, असा आशावाद मुख्याधापक पी. डी. चव्हाण, एस. व्ही. जाधव, तलाठी व्ही. बी. लांडगे यांनी व्यक्त केला.