शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 12:40 IST

एखादी व्यवस्था स्थिर होऊन शाश्वत झालेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये  कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडला जातो.

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : ओबीसीच अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे. महाराष्ट्रमध्ये सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. मात्र, मराठा आणि ओबीसी यांना एकमेकांसमोर विधानसभा निवडणुकीपर्यंत भिडवत ठेवतील अशी माझी धारणा आहे, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज, गुरुवारी सकाळी येथे व्यक्त केले. ओबीसी नेते उपोषणार्थी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची आज सकाळी वडीगोद्री येथे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पुढे बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमनेसामने आलेला आहे. परिस्थिती स्फोटक असल्याची जाणीव शासनाला मी अनेक वेळा करून दिलेली आहे. मात्र, शासनाकडून कुठलेही पाऊल पडताना दिसत नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांना देखील याबाबत भूमिका घ्यायला आपण सांगितलं पाहिजे. भटक्या विमुक्तांना आपले हक्काचे शाश्वत आरक्षण निघून जाते की काय ? अशी भीती आहे. याबाबत शासनाने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी देखील अॅड. आंबेडकर यांनी केली. 

सामाजिक सलोखा बिघडत आहे एखादी व्यवस्था स्थिर होऊन शाश्वत झालेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये  कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडला जातो. मराठा समाजासाठी कायम आरक्षण द्यायच असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे, अशी भूमिका अॅड. आंबडेकर यांनी मांडली. तसेच संविधानावरती ओबीसी विश्वास ठेवला हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते. बीजेपी संविधान बदलणार या प्रचारामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. सगेसोयरे शब्द जेते म्हणत होते त्याची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणीतरी करून द्यायला पाहिजे, जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही, असेही अॅड. आंबडेकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांच्या आग्रहाने  पाणी पिले व्हि.पी सिंग यांनी पाणी घेतलं नसल्यामुळे त्यांच्या किडनी वरती परिणाम झाला होता.  त्यामुळे किमान पाणी घ्यावं उपोषण सुरू ठेवावे, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना केली. त्यानंतर त्यांनी दोन्ही उपोषणार्थीना पाणी दिले.

मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. सात दिवसांच्या उपोषणामुळे हाके आणि वाघमारे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललीय. डॉक्टरांचा दोन्ही उपोषणकर्त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपचार न घेण्यावर दोन्ही उपोषणकर्ते ठाम आहेत.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJalanaजालना