रेमडेसिविरसह ऑक्सिजनची मागणी घटल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:11+5:302021-05-23T04:29:11+5:30
त्यातच उद्योगांना देण्यात येणारा ऑक्सिजन पूर्णत: बंद करून खुद्द विभागीय आयुक्त सुनील केंदेेंकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी येथील स्टील ...

रेमडेसिविरसह ऑक्सिजनची मागणी घटल्याने दिलासा
त्यातच उद्योगांना देण्यात येणारा ऑक्सिजन पूर्णत: बंद करून खुद्द विभागीय आयुक्त सुनील केंदेेंकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी येथील स्टील उद्योगातील ऑक्सिजनचा साठा थांबवून तो रुग्णांसाठी देण्याचे निर्देश दिले होते. त्याचाही चांगला परिणाम ऑक्सिजन मिळण्यास झाल्याचे दिसून आले. ऑक्सिजनचा स्वत:चा प्लांट असलेल्या संजय अग्रवाल यांनी देखील जालन्यातील रुग्णांसाठी परिश्रम घेत पुणे, छत्तीसगड, येथून ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून दिले होते. एकूणच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्याने येथे अडचणी आल्या नाहीत. परंतु मध्यंतरी रेमडेसिविरच्या इंंजेक्शनवरून प्रशासन प्रचंड अडचणीत सापडले होते. ती स्थिती आता बदलली असून, अनेक डॉक्टर आता रेमडेसिविर ऐवजी अन्य इंजेक्शनचा पर्यायी औषध म्हणून उपयोग करत आहेत. तसेच जिल्हा सरकारी रुग्णालयातील आयसीयूतील ८० रुग्ण वगळता अन्य रुग्णांना ऑक्सिजनची फारसी गरज पडत नसल्याचे डॉ. प्रकाश घोडके यांनी सांगितले.
चौकट
आता म्युकरमायकोसिसचे आव्हान
रमेडेसिविर तसेच ऑक्सिजनच्या संकटातून आरोग्य यंत्रणा थोडी सुटली आहे. परंतु आता कोविड नंतर होणारा गंभीर आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसने नवीन आव्हान उभे केले आहे. जवळपास १५ रूग्ण असून, त्यांना हवे असणारे बुरशी प्रतिबंधक इंजेक्शनचा तुटवडा असून, खूप मोजके इंजेक्शन जालन्यात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. यामुळे हा आजार असलेले रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक सध्या त्रस्त झाले आहेत.