सुखापुरीत कार्यक्रम
अंबड : तालुक्यातील सुखापुरी बसस्थानकात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दत्ता राक्षे, सखाराम सातभद्रे, भरत शिंदे, लक्ष्मण राखुंडे, दत्ता शिंदे, लहू ढवळे, दिनेश नागे, चांद शेख, माधव फाटक आदींची उपस्थिती होती.
आव्हाना ग्रामपंचायत
आव्हाना : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राम दुधे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास डी.एन. गावंडे, साहेबराव सपकाळ, समाधान साळवे, राजू गायकवाड, उत्तम गावंडे आदींची उपस्थिती होती.
शिवरायांना अभिवादन
सिपोरा बाजार : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अश्विनी दाभाडे, उपसरपंच बाबूराव कड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हकमी मोठे, देवता कड, माणिक कड आदींची उपस्थिती होती.
डायमंड ज्युबिली स्कूल
जालना : शहरातील डायमंड ज्युबिली स्कूलमध्ये ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.