बदनापूर येथील निर्मल क्रीडा प्रबोधन ट्रस्ट आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या संयुक्त विद्यमाने लोकमत रक्ताचं नातं या अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन जालना-औरंगाबाद मार्गावरील पाथरीकर कॅम्पसमध्ये करण्यात आले होते. प्रारंभी या शिबिराचे उद्घाटक तथा जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, लोकमत वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा, निर्मल प्रबोधन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, संचालिका सोनाली पाथ्रीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संपादक चक्रधर दळवी, प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस. एस. शेख, क्रीडा विभागप्रमुख डॉ. एन. जी. खान, फार्मसीचे प्राचार्य प्रा. सुनील जायभाये, डॉ. राहुल हजारे, डॉ. योगेश देसरडा, डॉ. राकेश कुहिरे, डॉ. सचिन सोमवंशी, डॉ. दीपक पाटील, अमृत तारो, सैयद नजाकत, गोविंद रांदड, कल्याण देवकते, सुजित बुटसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अधीक्षक देशमुख म्हणाले की, राज्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासनस्तरावर सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. असे असतानाच रक्त हा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. हा पूर्व धोका ओळखून लोकमतने सुरू केलेली ही रक्तदानाची मोहीम अभिनंदनीय व स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. आज शासस्तरावरून मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. असे असताना नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब गंभीर असल्याचे सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
--------------------------------------------------------------------------------
चौकट
लोकमत रक्ताचं नातं उपक्रमाने भारावलो - डॉ. देवेश पाथ्रीकर
गरजूंना एका वेळेस पैसे कुणाकडूनही मिळतील; पण रक्त वेळेवर मिळत नाही. त्यामुळे लोकमतने सुरू केलेला रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य असून जनतेने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याची हीच खरी वेळ आहे, असे आवाहन निर्मल क्रीडा व प्रबोधन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले की, बदनापूर तालुक्यात उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी १९९७ पासून येथे महाविद्यालय सुरू केले व त्यानंतर एमएस्सी, एमकॉम, बीबीए, एमसीए, इंग्रजी शाळा, डी. फॉर्मसी, बीफॉर्मसी अशा सुविधा निर्माण केल्या. कोरोना काळात दीड लाख आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप केल्या. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे लोकमतने सुरू केलेल्या या रक्ताच्या महायज्ञात आमच्या महाविद्यालयाने येथील अन्य स्थानिक संघटना, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयांसोबत यात सहभागी होण्याकरिता प्रयत्न केला याकरिता या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता विविध माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यामुळेच आज येथील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहून आपण समाधानी असल्याचे देवेश पाथ्रीकर म्हणाले.
---------------------------
यांनी घेेतले परिश्रम
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी निर्मल क्रीडा व प्रबोधन ट्रस्ट, बदनापूर तालुका माहेश्वरी सभा, जैन श्रावक संघ, गुरू मिश्री होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय शेलगाव, आर. पी. इंग्लिश स्कूल, चैतन्य इंग्लिश स्कूल, साई मॉडर्न इंग्लिश स्कूल, व्यापारी महासंघ, अमन व्यापारी महासंघ, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक कॉम्प्युटर यांनी यासाठी पुढाकार घेऊन हे शिबिर यशस्वी केले. या शिबिरास तहसीलदार छाया पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, सुभाषचंद्र कटारिया, सुरेशकुमार तापडिया, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, राजेश ज-हाड, भरत भांदरगे, भरत ज-हाड, अशोक संचेती, संजय छल्लानी, सचिन गिलडा, तालुका कृषी अधिकारी व्ही. एस ठक्के, संजय भुसारी, प्रा. सुनील जायभाये, डॉ. राहुल हजारे यांचीही यावेळी उपस्थिती होती. प्रा. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. जोशी यांनी मानले.