लालपरी असुरक्षित ; अग्निशमन यंत्र गायब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST2021-02-21T04:57:07+5:302021-02-21T04:57:07+5:30

जालना : राज्यात अलिकडे एसटी बसेसना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने शनिवारी जालना बसस्थानकातील काही बसचे ...

Redhead insecure; Missing fire extinguisher? | लालपरी असुरक्षित ; अग्निशमन यंत्र गायब ?

लालपरी असुरक्षित ; अग्निशमन यंत्र गायब ?

जालना : राज्यात अलिकडे एसटी बसेसना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने शनिवारी जालना बसस्थानकातील काही बसचे रिअ‍ॅलिटी चेक केले असता, धक्कादायक बाबसमोर आली आहे. आमच्या प्रतिनिधीने पाच बसेसची पाहणी केली असता, यात दोन बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे पाहायला मिळाले. तर तीन बसेसमध्ये असलेल्या अग्निशमन यंत्राची मुदत संपल्याचे दिसून आले आहे.

जालना बसस्थानकात दररोज ७२ बसेस येतात. येथे औरंगाबाद, नागपूर, नांदेड, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतील बसेस येतात. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची संख्याही मोठी असते. येथून दररोज १० ते ११ हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जीवितेस धोका निर्माण झाला आहे. आमच्या प्रतिनिधीने शनिवारी काही बसेसची पाहणी केली असता, यातील जिंतूर - औरंगाबाद (एमएच.२०.बीएल.९५५५) व जालना- सिडको (एमएच.२०.बीएल.१७८७) या दोन्ही बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे दिसून आले. तर उवर्रित बसेसमध्ये असलेल्या अग्निशमन यंत्राची मुदत संपल्याचे पाहायला मिळाले. अशा परिस्थिती एखाद्या बसला अचानक आग लागली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.

या बसेसची केली पाहणी

१ जिंतूर- औरंगाबाद (एमएच.२०.बीएल.९५५५)

२ जालना- सिडको (एमएच.२०.बीएल.१७८७)

३. जालना - औरंगाबाद (एमएच.२०.बीएल.१२८१)

४. पुणे - अंबड (एमएच.२०.बीएल.२८७०)

५. जालना- बीड (एमएच.२०.बीएल.१३२०)

प्रथमोपचार पेट्याही गायब

आमच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत, दोन बसमध्ये प्रथमोपचार पेट्या दिसून आल्या. परंतु, साहित्य दिसून आले नाही. इतर तीन बसमध्ये प्रथमोपचार पेट्या दिसून आल्या नाहीत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वायफाय नावालाच

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना मोफत वायफाय मिळावे, यासाठी प्रत्येक बसमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, सद्या वायफाय सेवाही नावालाच दिसत आहे. महामंडळाने तातडीने वायफाय सुरू करावी, अशी मागणी प्रवासी अमोल माने यांनी केली आहे.

आगारात आओ जावो घर तुम्हारा

जालना बसस्थानकात प्रवेश केला असता, आमच्या प्रतिनिधीला कोणीही हटकवले नाही. तेथे उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये कोणीही जात होते. त्यांना साधे हटकवल्या जात नव्हते. त्यामुळे जालना आगाराची अवस्था आओ जावो घर तुम्हारा अशी झाली आहे. यावरून बसस्थानकाची सुरक्षा ऐरणीवर आलेली दिसत आहे.

हा तर स्मोकींग झोन

जालना बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच हॉटेल्स, पानटपºया आहेत. चहा पिण्यासाठी येणारे लोक बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच धुम्रपान करतात. शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई केली आहे. ज्या व्यक्तीने धुम्रपान केले, त्याच्यावर कारवाई करण्याचे आधार संबंधित विभागांना देण्यात आले आहे. असे असतानाही आगार प्रमुखांच्या वतीने कारवाई केली जात नाही.

एसटीची आतून दुरवस्था

आमच्या प्रतिनिधीने पाहणी केलेल्या काही बससेची आतून दुरवस्था झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी सीट फाटलेले दिसले. तर काही ठिकाणी खिडकीचे काच फुटलेले दिसून आले. प्रतिक्रिया

जालना बसस्थानकातील सर्वच बसेसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्यात आले आहे. इतर डेपोच्या बसेची मला माहिती नाही. महामंडळाने काही दिवसांपूर्वीच बसमध्ये सुरू केलेली वायफाय सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वायफाय बंद आहेत.

पंडीत चव्हाण, आगारप्रमुख, जालना बसस्थानक

===Photopath===

200221\20jan_56_20022021_15.jpg~200221\20jan_57_20022021_15.jpg

===Caption===

एक बसची झालेली दुरवस्था~चालक बसलेल्या ठिकाणची झालेली दुरवस्था

Web Title: Redhead insecure; Missing fire extinguisher?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.