दाण्याच्या वेधाने घरी येतात कावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:25 IST2019-10-27T00:23:35+5:302019-10-27T00:25:00+5:30
भोकरदन येथील सुनील झंवर दररोज सकाळी कावळ््यांना दाणे टाकतात. हे दाणे खाण्यासाठी त्यांच्या घरी ३० ते ४० कावळे दररोज घरी येतात.

दाण्याच्या वेधाने घरी येतात कावळे
फकीरा देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्कफोटो
भोकरदन : एरवी आपण पक्ष्यांना दाणे टाकतो. परंतु, कावळ््याला फक्त दशक्रियेला नैवेद्य देतो. तेव्हा कावळ््याने नेवैद्य खावा, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, काही वेळा कावळा नैवेद्य खातो तर काही वेळा खात नाही. परंतु, भोकरदन येथील सुनील झंवर दररोज सकाळी कावळ््यांना दाणे टाकतात. हे दाणे खाण्यासाठी त्यांच्या घरी ३० ते ४० कावळे दररोज घरी येतात.
मोबाईलच्या वाढत्या प्रमाणाने पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नेहमी चिव-चिव करणाऱ्या चिमण्याही दिसेनासा झाल्या आहे. पक्ष्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी शासनाकडूनही प्रयत्न करण्यात येत नाही. पक्षी प्रेमीच पक्ष्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांचेही प्रयत्न असफल होत आहे. असे असताना भोकरदन येथे ३३ वर्र्षांपासून वास्तव्यास असलेले सुनील झंवर हे पक्ष्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळत आहे.
सुनील झंवर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील, ते ३३ वर्षांपासून भोकरदन येथे राहतात. पक्षीप्रेमी असल्यामुळे झंवर हे आपल्या घरावर पक्ष्यांना दाणे टाकत आहे. यामुळे दररोज त्यांच्या घरावर पक्ष्यांची शाळाच भरत आहे. दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या घरावर पक्षीच दिसतात. यात कावळ््यांचाही समावेश असून, ३० ते ४० कावळे दाणे खाण्यासाठी दररोज त्यांच्या घरी येतात. यामुळे परिसरातील लोकही आश्चर्यचकित होत आहे. एरवी दशक्रियेला आपण कावळ््यांना नेवैद्य देतो. परंतु, तेव्हाही कावळे खात नाही. परंतु, झंवर यांनी टाकलेले अन्न कावळे खात आहेत.