Rajendra Singh Gaur conferred the Presidential Medal | राजेंद्रसिंह गौर यांना राष्ट्रपती पदक बहाल

राजेंद्रसिंह गौर यांना राष्ट्रपती पदक बहाल

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना या पूर्वीच उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले होते. मुंबई येथे मंगळवारी राजभवनात झालेल्या एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बहाल करण्यात आले.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील असेलेले गौर यांनी बीेएसी अ‍ॅग्री पदवी पूर्ण केल्यावर १९९२ मध्ये पोलीस दलात रूजू झाले होते. जालना येथे कार्यरत असताना त्यांनी २०१२ मध्ये इंदिरानगर येथे एका बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा उत्कृष्ट तपास करून आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचविले.
दरम्यान गौर यांनी औरंगाबाद एटीएस, जालना, लातूर, सोलापूर, हिंगोली आदी ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. जालना येथे कदीम जालना तसेच वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा येथे कर्तव्य बजावले आहे. त्यांना हे पदक मिळाल्याबद्दल पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार आदींनी स्वागत केले. यापूर्वीही गौर यांचा विविध सेवा पदके देऊन जिल्हा पातळीवरही गौरव करण्यात आला.

Web Title: Rajendra Singh Gaur conferred the Presidential Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.