जीएसटीचे तीन ठिकाणी छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:36 IST2019-01-23T00:34:05+5:302019-01-23T00:36:56+5:30
जीएसटी विभागाच्या वतीने मंगळवारी जालन्यातील तीनपेक्षा अधिक रंगांच्या (पेंट) दुकानांवर छापे टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जीएसटीचे तीन ठिकाणी छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जीएसटी विभागाच्या वतीने मंगळवारी जालन्यातील तीनपेक्षा अधिक रंगांच्या (पेंट) दुकानांवर छापे टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद येथील जीएसटीच्या दक्षता विभागाच्या वतीने हे छापे टाकण्यात आले. यामध्ये तीन वरिष्ठ अधिकारी आणि पंधरा कर्मचाऱ्यांच्या समावेश होता. तीन वेगवेगळी पथके करून शहरातील रंगांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात प्रामुख्याने खरेदी-विक्रीचे रजिस्टर तसेच ई-वे बिल आणि जीएसटी कायद्यात नमूद केलेल्या कर आकारणीनुसार कराचा भरणा केला आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. या कारवाईमध्ये नेमका किती कर चुकविला, याचा तपशील रात्री उशिरापर्यंत कळू शकला नाही. दोन दिवस तपासणी केल्यानंतर यातील तथ्य पुढे येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वीही जालना औद्योगिक वसाहत परिसरात ई-वे बिलची अचानक तपासणी करून त्यांच्याकडून १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आला होता.