शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:53 IST

सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून जालना शहर व ग्रामीण भागाचा विकास साधण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. यासाठी सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना नगर परिषदेच्या वतीने घाणेवाडी जलाशय तुडूंब भरल्यानंतर या पाण्याचे शनिवारी पूजन करण्यात आले. यावेळी घाणेवाडी जल संरक्षण मंचसह रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी उद्योजक सुनिल रायठठ्ठा यांनी या ऐतिहासिक तलावाचे जालन्याची तहान भागविण्यासाठीचे महत्त्व विषद करून याचे जतन करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले, जायकवाडी येथून जरी योजना केली आहे. तरी देखील घाणेवाडी जलाशयातून विना विद्युत खर्चाचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे याकडे आपले जातीने लक्ष राहणार आहे. मध्यंतरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला. थिंक टँक स्थापन करणारजालना शहराचा विकास नेमका कशा पध्दतीने केला जावा, यासाठी नागरिकांमधून सूचना मागविण्यात येतील, या सूचनांवर त्या- त्या विभागातील तज्ज्ञांचे मत आणि मार्गदर्शन घेतले जाईल. यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच यासह शहरातील अन्य सामाजिक व्यक्ती आणि संस्थांना सोबत घेऊन थिंक टँक स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी केली.

टॅग्स :MLAआमदारJalana Muncipalityजालना नगरपरिषदRural Developmentग्रामीण विकास