पावणेसहा लाख क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:41+5:302020-12-27T04:22:41+5:30
जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणेसहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली ...

पावणेसहा लाख क्विंटल कापसाची खरेदी
जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणेसहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे.
गतवर्षी कोरोनामुळे सीसीआयमार्फत सुरू करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र बंद पडले होते. परराज्यातील अनेक मजूर गावी निघून गेल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्णकरण्यास मोठा विलंब झाला होता. यंदा मात्र, सीसीआयच्या वतीने जिल्ह्यात वेळेवर कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. यामध्ये जालना येथील केंद्रावर ४००५ शेतकऱ्यांचा एक लाख २ हजार ४३८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. बदनापूर येथील केंद्रावर १६५७ शेतकऱ्यांचा ५४ हजार ३३५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. परतूर येथील केंद्रावर ३७०५ शेतकऱ्यांचा ९४ हजार ४५९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मंठा येथील केंद्रावर २१६५ शेतकऱ्यांचा ५२ हजार ७३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. भोकरदन येथील केंद्रावर २५४० शेतकऱ्यांचा ८६ हजार ६६३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. राजूर येथील केंद्रावर ११५५ शेतकऱ्यांचा ३९ हजार ३३६ क्विंटल, कुंभार पिंपळगाव येथील केंद्रावर २३४५ शेतकऱ्यांचा ६२ हजार ७६ क्विंटल तर शहागड येथील केंद्रावर ३४८० शेतकऱ्यांचा ८४ हजार ६८७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
खाजगी व्यापाऱ्यांकडे २२ हजार क्विंटल
जिल्ह्यातील खाजगी व्यापाऱ्यांनी २२ हजार ५९ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यात परतूरमध्ये ३८०० क्विंटल, मंठ्यात ८ हजार ५५० क्विंटल, भोकरदनमध्ये ४ हजार ५०९ क्विंटल, कुंभार पिपंळगाव येथे ३१०० क्विंटल, तर शहागड येथील व्यापाऱ्यांनी २१०० क्विंटल कापसाची खरेदी कली आहे.
केंद्रावर वाहनांच्या रांगा
सध्या सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या बाहेर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कापूस खरेदीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना दोन- तीन दिवस केंद्रावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.