रस्ता रुंदीकरणासह पुलाच्या कामाची मागणी
बदनापूर : तालुक्यातील देवगाव, कुसळी, मालेगाव, वाकुळणी या रस्त्याच्या रुंदीकरणासह रस्त्यावरील चार पुलांच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष परमेश्वर गीते यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, सोपान सपकाळ, परमेश्वर गीते, मोबिन खान यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आहार ते आरोग्य कार्यशाळेचे आयोजन
जालना : भारतीय जैन संघटनेच्या वतीने १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत वैज्ञानिक डॉ. महेंद्र पालेशा यांचे आहार ते आरोग्य नवीन भोजनप्रणाली या विषयावर मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जैन संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले आहे.
अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
परतूर : शहरांतर्गत अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रेल्वेगेट ते महादेव चौक, मोंढा पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्याचीही अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.