‘जनसंघर्ष’ची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST2021-01-23T04:31:02+5:302021-01-23T04:31:02+5:30
आंब्याला मोहोर अंबड : तालुका व परिसरात यंदा आंब्याला चांगला बहर आला आहे. सततच्या आस्मानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...

‘जनसंघर्ष’ची तयारी
आंब्याला मोहोर
अंबड : तालुका व परिसरात यंदा आंब्याला चांगला बहर आला आहे. सततच्या आस्मानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा अवकाळी पाऊस झाला नाही, तर आंब्यापासून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
आरोग्य तपासणी
घनसावंगी : तालुक्यातील मूर्ती येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.पवन दाड, डॉ.हर्षदा कोल्हे, लहू मिसाळ, मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके आदींची उपस्थिती होती.
रुग्णसंख्येत वाढ
जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत.
पदाधिकाऱ्यांचा सत्कार
हसनाबाद : देऊळगाव कमान, वज्रखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, अशोक पवार आदींची उपस्थिती होती.