Pregnant woman's husband beaten and robbed at Jalana Women Hospital | गर्भवती महिलेच्या पतीस महिला रुग्णालयात मारहाण करून लुटले
गर्भवती महिलेच्या पतीस महिला रुग्णालयात मारहाण करून लुटले

जालना : प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या पतीवर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करून लुटले. ही घटना जालना येथील महिला रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी मध्यरात्री घडली.

जालना तालुक्यातील नेर येथील ज्ञानेश्वर भिमराव समृत (३०) यांच्या पत्नीला मंगळवारी प्रसूतीसाठी जालना येथील महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर समृत हे रुग्णालयाच्या इमारतीजवळ थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी समृत यांना घेराव घालून जबर मारहाण केली. त्यांच्याकडील एक मोबाईल, रोख रक्कम घेऊन चोरट्यानी पोबारा केला. चोरट्यांच्या मारहाणीत ज्ञानेश्वर समृत जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने रुग्णांसह नातेवाईकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Pregnant woman's husband beaten and robbed at Jalana Women Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.