६० तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:50+5:302021-02-20T05:28:50+5:30
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील बस स्थानक भागातील वीजपुरवठा ६० तासांनंंतर सुरळीत झाला आहे. औरंगाबादेतून केबल आणल्यानंतर येथील ...

६० तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील बस स्थानक भागातील वीजपुरवठा ६० तासांनंंतर सुरळीत झाला आहे. औरंगाबादेतून केबल आणल्यानंतर येथील रोहित्राची दुरुस्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.
तळणी बस स्टॅन्ड भागातील रोहित्राचे केबल जळाल्याने मंगळवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी दिवसभर केबल उपलब्ध न झाल्यामुळे रोहित्राची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. तळणीचा विजेचा प्रश्न गंभीर झाला असून, त्यातच शेतकऱ्याचे तोडलेले कनेक्शन तत्काळ जोडून द्यावे, या मागणीचे निवेदन मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता खंडागळे यांना निवेदन दिले. गुरुवारी सकाळपासून रोहित्राच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. तब्बल १२ तास दुरुस्तीचे काम केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, औरंगाबादवरून केबल उपलब्ध उपलब्ध करून देण्यास विलंब झाल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास काहीसा विलंब झाल्याचे कार्यकारी अभियंता खंडागळे यांनी सांगितले.
फोटो