शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:06 IST

विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांची मोठी अडचण होत आहे. तसेच शेतातील विहिरींमध्ये पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही.या अठरा गावातील ग्रामस्थांकडे जवळपास ३३ लाख २७ हजार रुपयांचे वीजबिल थकले आहेत. त्यामुळे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी, नालेवाडी, रेणापुरी, चंदनापुरी खुर्द व बुद्रूक, भांबेरी, रामगव्हाण, टाका, दुनगाव, एकलहेरा, शहापूर, झोडेगाव, पाथरवाला खुर्द, दोदडगाव इ. गावांना पाणीपुरवठा करणा-या विहिरींचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरण कंपनीने वेळोवेळी ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही ग्रामपंचायतींनी विजेची देयके भरली नाहीत. त्यामुळे १६ जानेवारी रोजी सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना असतांना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.दरम्यान, भांबेरी येथील सरपंच सहदेव भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामस्थांकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेत भरली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीनी वीज बिलासाठी निधी आणायचा कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.५० टक्के वीजबिल भरावेयासंदर्भात वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एस.एस. हरकळ यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, वरिष्ठांकडून मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची वसुली करण्याच्या सूचना आहेत. ही थकबाकी भरावी म्हणून कल्पना दिली होती. ही बाब गंभीरतेने न घेतल्याने आम्हाला हा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा करण्यासाठी ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिलWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प