प्लॉटिंगच्या वादातून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:27 IST2017-12-31T00:27:55+5:302017-12-31T00:27:57+5:30

राजूर येथे प्लॉॅॅॅॅॅटिंगच्या वादातून शनिवारी दुपारी दोन गटांत वाद होऊन जोरदार हाणामारी झाली

Plotting controversy in two groups | प्लॉटिंगच्या वादातून दोन गटांत हाणामारी

प्लॉटिंगच्या वादातून दोन गटांत हाणामारी

राजूर : राजूर येथे प्लॉॅॅॅॅॅटिंगच्या वादातून शनिवारी दुपारी दोन गटांत वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून राजूर पोलिसांत २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, राजूर येथील एकनाथअप्पा हाजबे यांचे टेंभूर्णी रस्त्यावर घर आहे. घराच्या बाजूला त्यांचे प्लॉट्स आहेत. त्यांनी नुकतेच प्लॉटिंगला तारकंपाऊंड केलेले आहे. शनिवारी सकाळी भारतअप्पा कोमटे यांच्यासह नऊ जण या ठिकाणी आले. आमच्या जागेवर अतिक्रमण का केले, असे म्हणून एकनाथअप्पा मारहाण करून तारकंपाऊंडचे नुकसान केले व जिवे मारण्याची धमकी दिली. एकनाथ हाजबे यांच्या तक्रारीवरून गजानन कोमटे, आत्मलिंंग कोमटे, भारत कोमटे यांच्यासह नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गजाननअप्पा कोमटे यांनीही एकनाथअप्पाविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली आहे. यावरून एकनाथ हाजबे, रामेश्वर हाजबे, शिवा हाजबे यांच्यासह अकरा जणांविरूध्द राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हसनाबाद ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विष्णू बुनगे, प्रताप चव्हाण, भिकाजी राठोड हे करीत आहेत.

Web Title: Plotting controversy in two groups