निर्मूलन समितीची कार्यकारिणी जाहीर
भोकरदन : भाेकरदन तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारिणी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी त्र्यंबक पाबळे, उपाध्यक्ष राम कदम, कार्याध्यक्ष राजेंद्र दारुंटे, सचिव कमलाकर इंगळे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह शिवाजी काेरके, विविध उपक्रम कार्यवाह समाधान मगरे, महिला सहभाग प्रमुख शारदा आरक, कायदा सल्लागार ॲड. किशाेर बनकर, वैज्ञानिक जाणिवा कार्यवाह भूषण जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.
बंजारा टायगर तर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार
जालना : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्यांचा बंजारा समाजबांधवांच्या वतीने बंजारा टायगर मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बंजारा टायगरचे संस्थापक कैलास चव्हाण, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, सहायक लेखा अधिकारी भारत चव्हाण, उत्तम पवार, पांडुरंग राठोड, नंदूसिंग नेनावत, बी. बी. जाधव आदींची उपस्थिती होती.
रेवगाव येथे ३३ रोपट्यांची लागवड
जालना : तालुक्यातील रेवगाव येथील शेत रस्त्याच्या बाजूला ३३ रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी उद्योजक सीताराम भोसले, सरपंच राम चव्हाण, लक्ष्मण शिंदे, जयराम कदम, भागवत घाटे, साबदे, कृष्णा चव्हाण, भागवत चोखनफळे, राम शेळके, अशोक शिंदे, कारभारी सातपुते, बाळासाहेब माने, महादेव शिंदे, संतोष शिंदे आदींची उपस्थिती होती.
पोलीस ठाण्यास रोपट्यांचे वाटप
जालना : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यास पाच रोपटे भेट देण्यात आली. यात आंबा, सीताफळ, बांबू, मोसंबी, चिंच या जातीच्या झाडांचा समावेश आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते अकबर शेख, सिराज काझी, भाऊसाहेब माळवदे, जमादार अभिजीत निकम, बाबासाहेब पठाडे, गोपनीय शाखेचे महेश तोटे, अशोक कावळे आदींची उपस्थिती होती.
वाढलेली काटेरी झुडपे अपघाताला निमंत्रण
आष्टी : परतूर तालुक्यातील गोळेगाव ते लोणी दरम्यान रस्त्याच्या कडेला दुतर्फा काटेरी झाडे वाढल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोळेगाव ग्रामपंचायतीने झाडे तोडण्याची मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग परतूर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय
मंठा : मागील काही महिन्यांपासून शहरासह परिसरातील वीज अचानक गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. थोडाही वारा, पाऊस आला की वीज गुल होत आहे. सतत हा प्रकार घडत असला तरी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक बिघाड दुरूस्ती केली जात नाहीत. अचानक वीज गुल होत असल्याने लघु उद्योजकांसह घरगुती ग्राहकांनाही नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तांत्रिक बिघाड कायम दूर करावेत, अशी मागणी होत आहे.