निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी आता परभणीकडे सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेनेचे जिल्हा संघटक तथा नगर पालिकेतील गटनेते मोहन अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ...
पारडगाव येथील शेतकरी दामोदर बाळाराम वढे यांची गट क्रमांक २५४ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमी प्रमाणे त्यांच्या मालकीच्या २५ शेळ्या बांधल्या होत्या. सोमवारी वढे हे शेतात गेले असता, त्यांना त्या अज्ञात पशूने मारल्याचे दिसून आले. ...
कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे. ...
ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीची नोटीस सदस्यांना देऊन नोटीस देणारे ग्रामविकास अधिकारी बैठकीस हजर राहिले नसल्याने ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायतला सोमवारी टाळे टोकून रोष व्यक्त केला. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे. ...