पान दोनचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:42+5:302020-12-28T04:16:42+5:30
मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक ...

पान दोनचा पट्टा
मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. यामुळे सेतू सुविधा केंद्रांसह शासकीय व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तळणीत अवैध प्रवासी वाहतूक जोरात
तळणी: मंठा तालुक्यातील तळणी- मंठा, लोणार- तळणी, तळणी- उस्वद- मंठा, जयपूर- वाटूर, गारटेकी- चौफुली, वझर सरकटे- सेवली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहेत. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत आहेत.
तळणी परिसरात सर्रास गुटखा विक्री सुरू
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे पान स्टॉल व किराणा दुकानातून सर्रास गुटखा विक्री होत आहे. सहज गुटखा मिळत असल्याने तरूण व्यसनाधीन झाले आहेत. याकडे अन्न व औषधी प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी बाबा मोरे, संजू कांबळे यांनी केली आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली आहे. असे असतानाही बहुतांश ठिकाणी सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आज रामनगर येथे निवृत्ती महाराजांचे कीर्तन
जालना : श्री दत्तजयंतीनिमित्त रामनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, याअंतर्गत सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. कीर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर हे सुश्राव्य हरिकीर्तनातून प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त, जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश यज्ञेकर यांनी दिली.
जांबसमर्थ येथे पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडाळात रब्बी हंगामात वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस व मोसंबी, डाळींब, सीताफळ आदी खरीप हंगामातील पिकांची वाट लावली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. सध्या रब्बीची पिके जोमात आली आहे; परंतु, वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
परतूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
परतूर : येथील बागल परिवाराच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ॲड. विशाल बागल यांनी दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले आहे. शासनानेही रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड. विशाल बागल यांनी केले आहे.