पान ४ चा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:24+5:302020-12-26T04:24:24+5:30

अंबड : चिंचखेड येथे चंपाषष्ठीनिमित्त रविवारी खंडोबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. मच्छिंद्रनाथ चिंचोली, सिंदखेड येथील दोन ...

Page 4 strap | पान ४ चा पट्टा

पान ४ चा पट्टा

अंबड : चिंचखेड येथे चंपाषष्ठीनिमित्त रविवारी खंडोबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. मच्छिंद्रनाथ चिंचोली, सिंदखेड येथील दोन काठ्या घेऊन दहा ते पंधरा भक्तगण लंगरसाठी हजर झाले. सोमवारी रात्री खंडोबा मंदिर परिसरात लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला.

मत्स्योदरीत गणित दिनानिमित्त कार्यक्रम

जालना : अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात मंगळवारी गणिततज्ज्ञ शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे, प्रा. डॉ. प्रशांत तौर, गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिगंबर भुतेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राजेगावला आरोग्य शिबिराचे आयोजन

तीर्थपुरी :राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राजेगाव येथील उपकेंद्रात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, पक्षाघात आदी आजारांच्या ४६ रूग्णांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन घुगे, आरोग्य सेविका खान, राठोड, समुपदेशक पाटणकर, आरोग्यसेवक कवठेकर, अमोल पवार आदींची उपस्थिती होती.

राज्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

जालना : राज्यातील शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा मुद्दा तत्काळ मार्गी लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्य सचिव भरत वानखेडे यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या राज्याध्यक्षा प्रतिभा भराडे, राज्यसचिव राजेंद्र आंधळे, कार्याध्यक्ष रमजान पठाण, राज्य कोषाध्यक्ष व्यंकटेश कोमटवार, राज्य उपसचिव भरत वानखेडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जि.प. शाळेत साने गुरूजी यांची जयंती साजरी

परतूर : राणीवाहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत साने गुरूजी जयंती साजरी करण्यात आली. उपक्रमशील शिक्षिका कल्पना वानरे, शिक्षिका तांगडे, शाळेचे मुख्याध्यापक सीताराम ठोके यांनी साने गुरूजींच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सांगता साने गुरूजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील थोर अश्रू कथेच्या श्रवणाने झाली.

जामवाडी येथे साने गुरूजी यांना अभिवादन

जालना : जामवाडी येथील रंगनाथराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमात प्राचार्य श्रीनाथ वाढेकर यांनी साने गुरूजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पर्यवेक्षक एम.एस. लांगडे, ज्ञानदेव अ‌वघड, राजेंद्र आंधाळे, ए.एन. पाटील, के. टी. माने, सुनील खेडेकर, आर.के. वाहुळे, व्ही. एन. वीर, एम. ए. नागरे, एस. एस.गोंडगे, शरद गोरे, नितीन झिणे आदींची उपस्थिती होती.

केळीच्या पिकावर फिरवला नांगर

राणी उंचेगाव : गेल्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने डाव्या कालव्याला पाणी आल्याने कुंभार पिंपळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्रात वाढ झाली. बहुतांश शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. मात्र, केळी उतरायला येताच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर पुन्हा परतीचा पाऊस झाल्याने मोठा फटका बसला. आता केळीला मागणी नसल्याने भाव पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी केळीचे घडासह झाडे कापून नांगर फिरविणे सुरू केले आहे.

मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

जालना : मतदार यादी पुनर्ररीक्षण कार्यक्रम मागील काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला असून, ३० डिसेंबरपर्यंत नागरिकांसह तरूणांनी आपले नाव नोंदवावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांनी केले आहे. ज्या नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय एक जानेवारी २०२१ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी फॉर्म सहा भरून द्यावा तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग याबाबी चुकीच्या नोंदवल्या असल्यास त्यामध्ये दुरूस्ती करावी.

रस्त्यावर कचरा

जालना : नगरपालिकेच्या कचरा संकलनाचा फज्जा उडत आहे. अनेक भागात घंटागाड्या येत नाही. विशेष म्हणजे नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी सूचना दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे.

निबंधक कार्यालय सुरू

जालना : जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालयांचे शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारीही दस्त नोंदणीचे कामकाज होईल. नागरिकांनी मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध मागण्यांचे निवेदन

जालना : अंबड येथील सां.बा. कार्यालयाचे शाखा अभियंता सगरूळे यांनी शौचालय हौद व रस्त्याचे काम बोगस केले असून, या प्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवदास शहाणे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जालना : एस.सी., एस.टी., ओबीसी वर्गावर अन्याय करणारी ग्रामपंचायत वाॅर्ड रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगतिवरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Page 4 strap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.