जालन्यात औताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:01 IST2019-03-31T00:00:39+5:302019-03-31T00:01:03+5:30
जालना लोकसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी कुठलाच बडेजावपणा न करता उमेदवारी अर्ज दाखल केला

जालन्यात औताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी कुठलाच बडेजावपणा न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठी गर्दी जमवून आणि शक्ती प्रदर्शन करून मते मिळतातच असे नाही, असा टोमणाही त्यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता लगावला.
शनिवारी सकाळी विलास औताडे यांच्या सोबत उमेदवारी अर्ज भरताना आ. राजेश टोपे, माजी आ. कल्याण काळे, कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आ. चंद्रकांत दानवे, विलास औताडे यांच्या पत्नी वैशाली औताडे, बबलू चौधरी, डॉ. संजय लाखे पाटील, पैठण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, शेख महेमूद, गोविंदचंदू राठोड, राजेश काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांशी बोलताना औताडे म्हणाले की, ‘आपण गेल्या निवडणुकीत दानवेंना मोदी लाट असतानाही मोठी टक्कर दिली होती. आज केंद्र आणि राज्य सरकारविरूध्द जनतेत रोष आहे. शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणाऱ्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.