परतूरमध्ये सखी सोहळ््याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:46 IST2019-09-27T00:46:13+5:302019-09-27T00:46:40+5:30
लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

परतूरमध्ये सखी सोहळ््याचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवारी २८ सप्टेंबर २०१९ रोजी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर येथे दुपारी ३ वाजता होणार आहे. या निमित्ताने विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत. सखींसाठी हा कार्यक्रम नि:शुल्क असून, सहभागासाठी
९४०३८५९७७७, ९४२३४५८८७५, ९७३०७१८६९९, या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.
भरगच्च विविध स्पर्धांनी आणि बक्षीसांनी नटलेला असा हा सखी सोहळा खास सखींसाठी असणार आहे. या सोहळ्यात परतूरसह परिसरातील सखींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भरघोस बक्षिसे जिंकावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने नृत्य स्पर्धा होणार असून, सहभागी स्पर्धकाला तीन मिनिटांचा वेळ दिला जाईल. याचबरोबरच फॅन्सी ड्रेस स्पर्धा (या स्पर्धेसाठी कोणतीही वेशभूषा करता येईल.) रांगोळी स्पर्धा होणार आहे. यासाठी सखी मंचच्या सदस्यांनी रांगोळी आणि त्यात भरावयाचे रंग हे त्यांनी स्वत:हून सोबत आणायचे आहेत. उखाणा स्पर्धेसाठी एक मिनिट वेळ दिला जाईल.