कांदा पिकाच्या आडून अफूची शेती;पोलिसांच्या धाडीत ११ लाखाचे अफूचे पिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:40 PM2021-03-01T17:40:50+5:302021-03-01T17:52:38+5:30

Crime News Crime News सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत pola

Opium cultivation under onion crop; Police seize Afu trees worth Rs 11 lakh | कांदा पिकाच्या आडून अफूची शेती;पोलिसांच्या धाडीत ११ लाखाचे अफूचे पिक जप्त

कांदा पिकाच्या आडून अफूची शेती;पोलिसांच्या धाडीत ११ लाखाचे अफूचे पिक जप्त

googlenewsNext

भोकरदन/जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील गोपी या गाव शिवारातील अफूच्या शेतीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी 10 वाजेच्यादरम्यान छापा मारले. यावेळी कांद्या बियाणांमध्ये अफूची शेती केल्याचे उघडकीस आले असून  पोलिसांनी 11 लाख रुपये किंमतीची 40 किलो अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी गजानन देऊबा डुकरे याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

या बाबतची माहिती अशी की, जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  मौजे गोपी  शिवारात एका शेतात कांद्याच्या पिकाच्या आडून अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी इंदरशिंग बहुरे,  जाफराबादचे सपोनि अभिजित मोरे यांच्या पथकाने सोमवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान गट क्रमांक 9 मध्ये गजानन डुकरे याच्या शेतात छापा मारला. यावेळी तेथील कांद्या बियाणांच्या पिकात अफूची लागवड आढळून आली. पोलिसांनी 40 किलो अफूची झाडे जप्त केली. याची किंमत जवळपास 11 लाख रुपये असल्याची माहिती आहे. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमूख व अपर पोलीस अधिकक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सपोनि अभिजित मोरे, पोउपनि  नितीन काकरवाल,  सहाय्यक फौजदार असेफ शेख, पोलीस कर्मचारी राजू डोईफोडे, सुभाष जायभाये, रामेश्वर सिनकर, नरहरी खारडे, पोलीस अंमलदार सचिन तिडके गणेश पायघन, योगेश पाटील पाईक, शाबान तडवी, निलेश फुसे चालक लक्ष्मण वाघ, कृषी विभागचे विजय गायकवाड यांच्या पथकाने केली. 

Web Title: Opium cultivation under onion crop; Police seize Afu trees worth Rs 11 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.