शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

वृध्द व्यापाऱ्याचे अपहरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:56 IST

५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली.

ठळक मुद्देअपहरणकर्त्यांनी मागितली खंडणी : पोलिसांनी मध्यरात्रीच केली नाट्यमयरित्या सुटका

जालना : ५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली.जालना येथील वृद्ध व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे नवा मोंढा येथे बारदाण्याचे दुकान आहे. ते सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात होते. घरी जात असताना अपहरणकर्त्यांनी स्कुटी थांबवून त्यांना चाकूचा धाक दाखवून कारमधून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी खेराजभाई भानुशाली यांच्या मुलाला फोन करून ५० लाखाची खंडणी मागितली. त्यांनी लगेचच पोलिसांना कळवले. त्यानंतर खंडणी देत असल्याचा बनाव करण्यात आला. तडजोडी अंती २ लाख रुपये देण्याचे ठरले. अपहरणकर्त्यांनी खंडणी घेऊन मुर्गी तलाव येथे बोलवले. त्यानंतर लगेचच सेंटमेरी स्कूल जवळ येण्यास सांगितले.त्यावेळी भानुशाली यांच्या मुलाने वडिलाना सोडण्याची मागणी केली. सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सेंटमेरी स्कूल येथे रक्कम ठेवण्यात आली. तेव्हाच पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. अपहरणकर्त्यांनी ५० लाखावरून थेट दोन लाखावर येण्याची तयारी दर्शविल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जालन्यातील घटना : रिक्षा, कारमधून पोहचले पोलीससायंकाळी व्यापा-याचे अपहरण झाल्यानंतर त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे स्वत: त्यांच्या पथकातील कर्मचाºयांसह दोन रिक्षाव्दारे सेंटमेरी भागात पोहचले. तर अपहरण केलेल्या व्यापाºयाच्या मुलाला एका कारमध्ये दोन लाख रूपये घेऊन पाठविले.खंडणी खोरांनी पैसे देण्यासाठी दोन लाख रूपये प्रथम सेंटेमेरी शाळेजवळील लिंबाच्या झाडाखाली ठेवण्याची सूचना केली. परंतु नंतर पुन्हा ही बॅग सेंटमेरी शाळेजवळील गल्लीत आणून देण्याचे अपहरण कर्त्यांनी केल्याने पोलिस संभ्रमित झाले.परंतु दोन लाख घेतल्यावर अपरहण कर्त्यांनी वृध्द व्यापा-यास सोडून दिल्यावर लगेचच रिक्षात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अपहकरण कर्त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी एक आरोपी ठेच लागून पडला. त्याच्याकडून दोन लाख रूपये तसेच गुप्ती जप्त करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात आतापर्यंत तीन संशयित ताब्यात घेतले असून, एक कार जप्त केल्याची माहिती गौर यांनी दिली.यासाठी तात्पुरत व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला होता.

टॅग्स :JalanaजालनाKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस