बोगस अनुदान वाटपप्रकरणी तलाठ्यासह कृषी सहाय्यकाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:20+5:302021-05-31T04:22:20+5:30
गतवर्षी बोररांजणी परिसरात अतिवृष्टी झाली होती. यात पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना ...

बोगस अनुदान वाटपप्रकरणी तलाठ्यासह कृषी सहाय्यकाला नोटीस
गतवर्षी बोररांजणी परिसरात अतिवृष्टी झाली होती. यात पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी व कृषी सहाय्यकांना दिल्या होत्या. त्यानुसार पंचानामेदेखील करण्यात आले. परंतु येवला सजाचे तलाठी शीतल जाधव, कृषी सहाय्यक के. जी. कचकलवाड यांनी ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा नाहीत, त्यांना फळबागा दाखवून अनुदान वाटप केले होते. याबाबत सुंदर जाधव, उद्धव जाधव, किशोर जाधव यांनी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर तहसीलदार देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी आदेश दिले होते. या चौकशीत बरचशी नावे बोगस असल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांकडे फळबाग नसतानाही त्यांना अनुदान देण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले. तलाठी शीतल जाधव, कृषी सहाय्यक के. जी. कचकलवाड यांनी याप्रकरणी आर्थिक अपहार केल्याचा ठपका ठेवून त्यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत या नोटिशीवर खुलासा देण्याचे सांगण्यात आले.