शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

व्हीलचेअर असूनही उपयोगात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

जालना बस स्थानकावरील स्थिती; अपंग, ज्येष्ठांची बस स्थानकात कसरत जालना : अपंग व ज्येष्ठांना बसस्थानकात ये-जा करण्यासाठी अडचण येऊ ...

जालना बस स्थानकावरील स्थिती; अपंग, ज्येष्ठांची बस स्थानकात कसरत

जालना : अपंग व ज्येष्ठांना बसस्थानकात ये-जा करण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जालना येथील बस स्थानकात व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीलचेअर असतानाही तिचा उपयोग केला जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये समोर आले.

बस स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. त्यातच पार्किंग ही बस स्थानकापासून दूर असते. अशा परिस्थितीत अपंग व ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना अडचण होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रत्येक बस स्थानकात व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु बस स्थानकात असलेल्या व्हीलचेअरचा उपयोग केला जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये समोर आले. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सोमवारी जालना बस स्थानकाची पाहणी केली असता, ज्येष्ठ व अपंगांना बस स्थानकात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. जालना बस स्थानकात दररोज ७१ बसेस येतात. या बसेसद्वारे १० ते ११ हजार प्रवासी प्रवास करतात. महामंडळाकडून बस स्थानकात ये-जा करणाऱ्या अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी एका व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु या व्हीलचेअरचा उपयोग केला जात नसल्याचे दिसून आले. एका ज्येष्ठ नागरिकाला बस स्थानकात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले. याबाबत जालना बस स्थानकाचे आगारप्रमुख पंडित चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, जालना बस स्थानकात एक व्हीलचेअर असून, सध्या बस स्थानकाचे काम सुरू असल्याने सदरील व्हीलचेअरचा उपयोग केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

व्हीलचेअर स्टोअर रूममध्ये

जालना बस स्थानकात एक व्हीलचेअर असून, सध्या या व्हीलचेअरचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे बस स्थानकातील एका स्टोअर रूममध्ये व्हीलचेअर ठेवण्यात आल्याचे दिसून आले. या व्हीलचेअरची अवस्थाही बिकट असल्याचे दिसून आले. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

बस स्थानकात रॅम्प आहे

जालना बस स्थानकाच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू आहे. बस स्थानकात अपंग व ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करण्यासाठी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे, परंतु व्हीलचेअरचा उपयोग केला जात नसल्याने रॅम्पची सुविधा असूनही फायदा नाही.

माझे शनिमंदिर परिसरात दुकान आहे. मी दररोज बसने ये-जा करतो. अपंग असल्याने मला ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. बस स्थानकात व्हीलचेअरची व्यवस्था असते, हे मला तुमच्याकडून समजले. बस स्थानक प्रशासनाने व्हीलचेअरची व्यवस्था करावी.

बळीराम तिडके, अपंग नागरिक

मी शासकीय कामांसाठी जालना येथे येत असतो. वय जास्त असल्याने प्रवास करताना मला मोठा त्रास होतो. बस स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. बसस्थानकात व्हीलचेअर असूनही उपयोगात नाही. याकडे एस.टी. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

जिजा गायकवाड, बीड

बस स्थानकात दररोज ७१ गाड्या येतात. दररोज १० ते ११ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे गर्दी मोठी असते. बस स्थानकात अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी एकच व्हीलचेअर आहे, परंतु बस स्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे व्हीलचेअरचा वापर केला जात नाही.

पंडित चव्हाण, आगारप्रमुख, जालना