मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:34 AM2020-02-23T00:34:30+5:302020-02-23T00:35:21+5:30

ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.

No need for medication if the mind is strong | मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही

मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : आपल्या जीवनात निष्ठेला खूप महत्त्व असते. माणूस मृत्यूला खूपच घाबरतो. ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.
अंबड येथे यशवंत व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प शनिवारी रात्री गजानन वाव्हळ यांनी गुंफले. वाव्हळ यांनी संत तुकोबारायांच्या गाथेतील शिवदर्शन मार्गदर्शन केले. आजच्या तरूणाईला व्यसन बसू देत नाही. त्यामुळे युवकांनी युवकांनी तुकोबारायांचे विचार आत्मसात करावेत. अधिकाधिक वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी. ज्यांच्याकडे विचारांचा ठेवा असेल तोच जगात श्रेष्ठ ठरेल. उंच झेप घ्यायची असेल तर चार पावले मागे घ्यायला शिका. सर्व संत त्यांच्या जागी श्रेष्ठ असून, जे युवक आई-वडिलांची सेवा करतात त्यांना देवळात जाण्याची गरज नाही.
या व्याख्यान कार्यक्रमास माजी आमदार शिवाजी चोथे, पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे, राजेंद्र डहाळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानासह अंबड शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. शेवटी हरिश्चंद्र शिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिवाजी महाराज, तुकोबांच्या नात्याचा उलगडा
संस्कारांची शिदोरी १६ व्या शतकात आपल्याला दिली ते म्हणजे छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवरायांनी जाती-पातीची बंधने तोडून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, मराठी माणसाचे राज्य हे त्यांनी सर्वांच्या मनावर बिंबविले. प्रत्येक पुरूष आप आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असतो. आई-वडिलांना देव मानले तर देवळात जाण्याची गरज नाही, हे सांगतानाच संत तुकाराम यांच्या काही अभंगातून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांच्या नात्यांचा उलगडा करत वाव्हळ यांनी आपल्या व्याख्यानात शिवदर्शन घडविले. शिवाय विविध विषयांवर वाव्हळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, अंबड येथील यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने पुढील काळात विविध वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांचा प्रतिसाद
अंबड येथे गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यान कार्यक्रमास शहर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी लेखक अरविंद जगताप यांचे व्याख्यान झाले. तर शनिवारी आयोजित गजानन वाव्हाळ यांच्या व्याख्यानासही युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

Web Title: No need for medication if the mind is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.