शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी कोटा येथे जाण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

जालना : जालन्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी पैशांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी व विद्यार्थ्यांना जई, नीट सीईटी परीक्षेची ...

जालना : जालन्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी पैशांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी व विद्यार्थ्यांना जई, नीट सीईटी परीक्षेची तयारी करण्यासाठी शिवाजी पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी पीएफसी सेंटर सुरू केले. पाहता पाहता या सेंटरने मोठी प्रगती साधली असून, तज्ज्ञ मार्गदर्शक, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी कोटा किंवा इतर शहरात जाण्याची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन मध्य प्रदेशातील डिव्हिजनल कमिशन रमण कुमार यांनी केले.

शहरातील पाटील फाउंडेशन सेंटरच्या वतीने शहरातील पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमण कुमार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रवि राऊत, इस्कॉनचे प्रमुख राधेगोविंद, दशरथ राठोड, सुदर्शन उबाले, अकबर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बायोलॉजीचे मनीषकुमार, नागेश पांडेय यांनी जालन्यातील १०० होतकरू मुलांना पीफसीकडून मोफत शिकवणी दिली जाणार असल्याचे सांगितले. तसेच पीएफसीमध्ये मनीष कुमार, नागेश पांडे, अभयकुमार, दीपक कुमार हे तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, कमी शुल्कात निवास, मेस, पूर्णवेळ अभ्यासिका उपलब्ध करून दिली असल्याची माहिती संस्थाचालक शिवाजी पाटील, कृष्णा म्हस्के, सचिन गिरी यांनी दिली.

फोटो