'अमर रहे', 'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवान नितीन राठोड यांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:08 IST2019-02-16T15:53:01+5:302019-02-16T16:08:19+5:30

जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव आज जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले.

Nitin Rathore is honored with the blessings of 'Amar Rahe', 'Amar Rahe' | 'अमर रहे', 'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवान नितीन राठोड यांना मानवंदना

'अमर रहे', 'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवान नितीन राठोड यांना मानवंदना

जालना : जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव आज जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे  औरंगाबाद चौफुली येथे त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नागरिकांनी दिलेल्या 'अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे' च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.

बुलढाणा जिल्ह्यातील जवान नितीन शिवाजी राठोड हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी  विमानाने औरंगाबादेत आणण्यात आले. त्यानंतर  एका वाहनांने त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी नेण्यात आले. त्यांना सलामी देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी औरंगाबाद चौफुली येथे गर्दी केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'पाकिस्तान मुदार्बाद, 'अमर रहे' , 'अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सलामी वाहिल्यानंतर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले.  

याप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Nitin Rathore is honored with the blessings of 'Amar Rahe', 'Amar Rahe'