शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

ठेकेदारानं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 7:23 PM

देशात आजवर मी सहा लाख कोटीची काम केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला

ठळक मुद्दे'ठेकेदारानं रस्तेबांधणीचं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही''देशात आजवर मी सहा लाख कोटीची काम केली, पण लक्ष्मीदर्शन घेतलं नाही'नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर, दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन झालं

जालना, दि. 29 - ठेकेदारानं रस्तेबांधणीचं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दांत केंद्रीय परिवहनमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी इशारा दिला आहे. यासोबतच देशात आजवर मी सहा लाख कोटीची काम केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला. 

नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर, दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.  कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरदेखील उपस्थित होते.

' देशभरात आजवर मी इतकी काम केली असताना ठेकेदार कोण असतो? हे मला माहित नसतं. आजवर एकाही ठेकेदाराच्या पैशाचा मी मिंदा नाही', असं नितीन गडकरी बोलले आहेत. सोबतच शेगाव-पंढरपूर रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. 'रस्त्याचं काम चांगलं होत नसेल, तर फक्त मला कळवा. या ठेकेदाराला मी बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही', असा इशाराच गडकरींनी यावेळी दिला आहे.

मी महाराष्ट्राचा असल्याने माझ्या महाराष्ट्राला केंद्रातून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यात यशस्वी ठरलो.येत्या पाच वर्षात 3 लाख कोटींची कामे महाराष्ट्रात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 65 हजार कोटी रुपयांचा विविध कामासाठी निधी मराठवाड्याला दिला आहे. आणखी 10 हजार कोटी रुपये देणार आहे.मराठवाडयाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही. ही कामे डिसेंबर पूर्व सुरु होईल असे गडकरी यांनी सांगितले.

खासदार आमदारांनी राजकारण बाजूला ठेऊन भूसंपादन करावे....चार पदरी रस्ता करण्याचे आदेश देतो मात्र भूसंपादन करण्यासाठी तुम्ही खासदार आमदारांनी राजकारण बाजूला ठेऊन मदत करावी  मी रस्त्यासाठी निधी कमी पडु देणार नाही.काम पूर्ण झाल्यानंतर दानवे तुमच्या हातात कात्री राहील व सत्तारांच्या हातात रिबिन देईल असे गडकरी यांनी सांगितले.

एक वर्षात काम पूर्ण करणार.........पाऊस उघडला तर तीन दिवसात काम सुरु होईल.नाही तर एक महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची काम सुरु होईल.या रस्त्याच्या काम करण्याचा  कालावधी दोन वर्षाचा आहे. मात्र एक वर्षाच्या आत ही सर्व कामे झाली पाहिजे असे आदेश गडकरी यांनी यावेळी ठेकेदार व संबधित  अधिका-यांना दिले.

मी लक्ष्मी दर्शन घेतले नाही.........मैं जो बोलता हूँ ....वो करके दिखाता हूँ ...मराठवाड्यासाठी 64 हजार 730.32 कोटी रुपयांची कामे मंजूर केली. त्यात मी लक्ष्मी दर्शन घेतले नाही. या निधीतून होणारे रस्ते हे 200 वर्ष टिकेल यात एकही खड्डा पडणार नाही जर या कामात ठेकेदारांनी गडबड केली. तर बुलडोजर खाली आडवा करेल असा दम देत ....मैं जो बोलता हूँ ....वो करके दिखाता हूँ ...जर सांगितलेले काम नाही केले तर प्रसार माध्यमांनी याला ब्रेकींग न्यूज करावे. विकासकामात मी राजकारण करणार नाही असं नितीन गडकरी बोलले आहेत