शेलगावची निदा खान राज्यात सर्वप्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:51 IST2020-01-25T00:50:42+5:302020-01-25T00:51:02+5:30
शेलगाव येथील गुरू मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. निदा खान हिने पाच सुवर्णपदकासह ‘बीएचएमएस’ परीक्षेमध्ये राज्यातील ५४ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

शेलगावची निदा खान राज्यात सर्वप्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथील गुरू मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. निदा खान हिने पाच सुवर्णपदकासह ‘बीएचएमएस’ परीक्षेमध्ये राज्यातील ५४ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
शेलगाव येथील गुरूमिश्री होमीओपॅथीक वैद्यकिय महाविद्यालयाची विद्यार्थीनी निदा खान ने बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतीम वर्ष अशा प्रत्येक वर्षी राज्यात सर्वप्रथम येण्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिला एकूण पाच सुवर्णपदके मिळाले आहेत़ मंगळवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १९ व्या दिक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोशारी, वैद्यकिय शिक्षणमंत्री अमीत देशमुख, मंत्री छगन भुजबळ, कुलगुरू दिलीप म्हैसेकर, मोहन खामगावकर, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण आदींच्याहस्ते तिला हे पाच सुवर्णपदके प्रदान करण्यात आले. याबद्दल महाविद्यालयातर्फे, डॉ. कांचन देसरडा, डॉ. योगेश देसरडा, प्राचार्य डॉ. बी. एल. दुधमल, डॉ. जे. टी. दरक, डॉ. बोरा, डॉ. तुफान चक्रवर्ती, डॉ. मिनल राचलवाल, डॉ. धनश्री सबनीस आदींनी तिचे स्वागत केले.