'धुमाळ' नावाभोवती जळीत कांडाची सुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:41 IST2018-01-10T00:41:18+5:302018-01-10T00:41:26+5:30

बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणाच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी सामनापूर, औरंगाबाद व मुंबई येथे तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

The needle of the suspect around 'Dhumal' name | 'धुमाळ' नावाभोवती जळीत कांडाची सुई

'धुमाळ' नावाभोवती जळीत कांडाची सुई

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणाच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी सामनापूर, औरंगाबाद व मुंबई येथे तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांच्या तपासाची सुई धुमाळ नावाभोवती फिरत आहे.
धुमाळ नावाच्या व्यक्तीबाबत अनंतच्या नातेवाईकांना काहीच माहिती नाही. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सांगितले, की अनंतच्या गावी सामनापूरला, तसेच तो औरंगाबादला राहत असलेल्या ठिकाणी आणि मुंबईमध्ये ज्या कंपनीत त्याने ट्रक किरायाने दिला होता, अशा तीन ठिकाणी स्वतंत्र तीन पथके पाठविण्यात आली आहेत.

Web Title: The needle of the suspect around 'Dhumal' name