शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

जालना, बदनापुरात राकाँची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:02 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जालना आणि बदनापूर येथे निदर्शने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / बदनापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरूध्द ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जालना आणि बदनापूर येथे निदर्शने केली.जालना शहरातील गांधी चमन परिसरात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यामुळे दुपारी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलीसही गोंधळून गेले होते.या आंदोलनात माजी आ. अरविंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुरेश खंडागळे यांच्यासह कैलास मदन, बाळासाहेब वाकुळणीकर, अश्विनी गायकवाड, अरूण पैठणे, राम सिरसाठ, दादाराव साळवे, सनी रगडे, इकबाल शेख, अदनान सौदागर, फिरोजखान पठाण आदींचा सहभाग होता.आंदोलनकर्त्यांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरूध्द ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे,तो सूडभावनेतून केला आहे. एकूणच शरद पवार हे कुठल्याही बँकेचे संचालक नसताना त्यांच्यावर कुठल्या आधारे गुन्हा दाखल केला,याचा खुलासा सरकारकडून अद्याप झालेला नाही.शरद पवार हे या गुन्ह्यामुळे घाबरून गेले नसून, उलट ते स्वत: २७ तारखेला मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. यावरून त्यांच्याविरूध्द दाखल झालेला गुन्हा किती तकलादू आहे, हे स्पष्ट होते, असे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलनSharad Pawarशरद पवार