नागपूरचा मोर्चा राजकीय, राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्षाचा मोर्चा : मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 14:39 IST2025-10-10T14:39:05+5:302025-10-10T14:39:39+5:30
हा ओबीसींचा मोर्चा नाही राहुल गांधीच्या सांगण्यावर वरून आहे.ओबीसी मोर्चा माध्यमातून राजकारण सुरू आहे.ओबीसी मोर्चा नाही तो ओबीसीच्या नावा खाली जातीचा मोर्चा आहे.

नागपूरचा मोर्चा राजकीय, राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्षाचा मोर्चा : मनोज जरांगे पाटील
पवन पवार
वडीगोद्री -नागपूर चा मोर्चा राजकीय, राजकीय स्वार्थासाठी तो काँग्रेस पक्षाचा मोर्चा. हा मोर्चा ओबीसी साठी नाही आणि ओबीसी कल्याणासाठी नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील ओबीसी मोर्चावर दिली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
हा ओबीसींचा मोर्चा नाही राहुल गांधीच्या सांगण्यावर वरून आहे.ओबीसी मोर्चा माध्यमातून राजकारण सुरू आहे.ओबीसी मोर्चा नाही तो ओबीसीच्या नावा खाली जातीचा मोर्चा आहे. हे फक्त जातीचे नेते आहे.धनगरांचा फक्त वापर करता त्यांच्या आरक्षण बद्दल कोणी बोलत नाही. अशी टिका मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर केली आहे.
आम्ही अगोदर शरद पवार साहेबांवर बोललो का? त्यांचा तो देशमुख माणूस का बोलला.???
1994 च्या GR वरून शरद पवारांना आज पश्चातापत वाटत असेल 94 ला झाले ते झाले, जो देव्हारा व्हायचा तो झाला आहे.
ओबीसींना पवार साहेबांनी आरक्षण दिले.16 टक्के. ते आमच आरक्षण होत ते लोक त्यांच्या कडून रहाला पाहिजे होते, सापाला दूध पाजून बसले.. त्यांना पश्चाताप होत असेल, ज्यांना आरक्षण दिलं ते आपल्या बाजूने राहिले नाहीत म्हणून मी शरद पवार यांच्यावर बोललो टीका केली नाही मी फक्त फरक सांगितला त्यांच्या देशमुख सारख्या नेत्यामुळे त्यांच्या नेत्यांना डाग लागतो.विविध राजकीय पक्षाचा ओबीसीना खेचण्यासाठी प्रयोग आहे त्यामुळे ओबीसी नेत्यातच स्पर्धा लागली आहे.मागासवर्गीय आयोगाचे निकष पूर्ण न करता तुम्ही बोगस आरक्षण घेत आहात अशी टिका केली आहे.