नगरपालिकेचा मालमत्ता कर वसुलीचा टक्का घसरणार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:15 AM2019-03-20T01:15:04+5:302019-03-20T01:15:24+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांना हक्काचे उत्पन्न असलेल्यसा मालमत्ता कराची वसुली यंदा घटली आहे.

Municipality's property tax collection will fall ...! | नगरपालिकेचा मालमत्ता कर वसुलीचा टक्का घसरणार...!

नगरपालिकेचा मालमत्ता कर वसुलीचा टक्का घसरणार...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांना हक्काचे उत्पन्न असलेल्यसा मालमत्ता कराची वसुली यंदा घटली असून, कर विभागातील जवळपास सर्व कर्मचारी हे निवडणूक कामात गुंतल्याने हा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. जालना पालिकेची जवळपास ४२ कोटी रुपये
नागरिकांकडे करापोटी थकले आहेत.
यंदाच्या या निवडणुका खऱ्या अर्थान फाल्गून महिन्यात आल्या आहेत. त्यामुळे आधिच उल्लास आणि त्यात फाल्गून मास ही मराठातील म्हण येथे तंतोतंत लागू पडते. एकीकडे जालन्यातील अनेकांची मालमत्ता कर भरण्याची ऐपत आहे, परंतु चलता या अंतर्गत जालन्यातील आर्थिदृष्ट्या सामर्थ्यवान नागरिकही त्यांचा मालमत्ता कर थकवत असल्याचे दिसून आले.
एकूणच मालमत्ता करा प्रमाणेच वृक्षकर, रोहयो कर, शिक्षण कराची देखील पालिकेकडून आकारणली केली जाते. मात्र यंदा कर आकारणीच्या नोटीसा देण्यात आल्या असून, ज्यांच्याकडे पाच हजार रूपयांपेक्षा कर थकला आहे, त्यांना या नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐन मार्च महिन्यात ही निवडणूक आल्याने याचा मोठा फटका जसा पालिकेला बसला आहे, तसचा तो अन्य विभागालाही बसल्याचे दिसून आले.
जालना पालिकेने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांना वगळून इतर कर्मचाºयांना निवडणुकीची कामे द्यावीत अशी मागणी करणारे विनंती पत्र जिल्हाधिका-यांना पाठवले होते. मात्र, याचा विचार झाला नसल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीसाठी वेगवेगळ्या विभागातील जवळपास १४ हजार कर्मचारी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्याधिका-यांनी यात लक्ष घालून जे कर्मचारी निवडणूक कामात नाहीत त्यांना वसुलीचे काम दिल्यास मदत होईल.

Web Title: Municipality's property tax collection will fall ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.