भोकरदन शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिका सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:58 IST2020-01-07T00:57:57+5:302020-01-07T00:58:16+5:30
प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक लॅब सुरू करण्यात आली आहे.

भोकरदन शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिका सरसावली
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उदघाटन शनिवारी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरात ४ ते १० जानेवारीपर्यंत ही प्लास्टिक लॅब सुरू राहणार असून, या लॅबचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्षा आशा माळी, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, सोशल लॅबचे कार्यकारी संचालक राहुल जवारे, नगरसेवक शेख कदीर, सुरेश तळेकर, निर्मला भिसे, रमेश तळेकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.
यावेळी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून दाखविण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्षा देशमुख म्हणाल्या की, शहरातील नागरिकांनी घंटा गाडीतच ओला व कोरडा कचरा वेगवेगळा टाकावा.
तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी लॅबच्या तज्ज्ञांनी प्लास्टिकचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले.