शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या उभारण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:28 IST

प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन तीन महिने झाले आहेत. असे असतानाही प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागवून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगून प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा केला जातो. आता निवडणूक होऊन आठवडा झाला आहे. असे असताना प्रशासनाकडून जनावरांचा चारा, टँकरची व्यवस्था अद्यापही केलेली नाही. ग्रामसेवक, मंडळअधिकारी मुख्यालयी थांबतच नसल्याने कोणाकडे दाद मागावी, अशी स्थिती जिल्ह्यात झाली आहे. प्रशासनाला निवेदन देऊनही या गंभीर बाबीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने संतप्त शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रखरखत्या उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालसमोर जनावरासह आंदोलन केले. जिल्ह्यात मागणी तेथे चारा छावण्या सुरु करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली. निवेदनावर आप्पासाहेब कदम, दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, डॉ. भागवत काळे, अशोक आटोळे, कृष्णा पिसोरे, शिवाजी तुपे, अंकुश लकडे, मनोहर गात आदींच्या स्वाक्ष-या आहेत.सोलापूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यासारखी दुष्काळी परिस्थिती नसताना येथील जिल्हाधिका-यांनी अधिकारी कर्मचा-यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश दिले आहेत. दिरंगाई केल्यास कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीने जनता होरपळत असताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याकडे लक्ष देऊन तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकाºयांसह अन्य कर्मचा-यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagitationआंदोलन