मसापच्या अध्यक्षपदी भुतेकर, तर तडेगावकर सचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:44 IST2019-07-08T00:44:04+5:302019-07-08T00:44:28+5:30
मराठवाडा सहित्य परिषद जालना शाखेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर यांची निवड झाली आहे.

मसापच्या अध्यक्षपदी भुतेकर, तर तडेगावकर सचिव
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाडा सहित्य परिषद जालना शाखेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर, सचिवपदी पंडितराव तडेगावकर, उपाध्यक्षपदी प्रा. जयराम खेडेकर तर कोषाध्यक्षपदी कैलास भाले यांची निवड झाली आहे.
सर्वानुमते कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. सूचक व अनुमोदक म्हणून जेष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, राजेंद्र राख, डॉ. सुधाकर जाधव, राम सावंत, अॅड. विनायक चिटणीस, हरिहर शिंदे यांनी काम पाहिले. जालना शाखेने प्रथमच बिनविरोध निवड करून एक नवा पायंडा मराठवाड्यात पाडल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
जालना शहर हे साहित्यिक व सांस्कृतीक क्षेत्रास पाठबळ देणारे असून, पदाच्या माध्यमातून जालना शहरात म.सा.प. ला नवी उभारी देण्यासह साहित्यिक उपक्रम व साहित्यिकांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेवून साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्नशील राहिल, असेही ते म्हणाले. प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी रेखा बैजल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, प्रा. रावसाहेब ढवळे, प्रा. बसवराज कोरे, राम गायकवाड, गणेश राऊत, अब्दुल हफिज, प्र. स. हुसे, प्रा. गजानन जाधव, डॉ. संभाजी पाटील, डॉ. व्ही.वाय. कुलकर्णी, अॅड. मिसाळ, प्रा. विलास भुतेकर, प्रा. संदीप पाटील, डॉ. भगवानसिंह ढोबाळ, डॉ. जगन्नाथ खंडागळे, यशवंत सोनवने, प्रा. सुनंद तिडके, सुलभा कुलकर्णी, शकुंतला कदम, विमलताई आगलावे, विनीत साहणी, रमेश तवरावाला, एस.एन. कुलकर्णी, ज्योती धर्माधिकारी, अरूण सरदार यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.