मोबाईलचा स्फोट होऊन मुलगा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 05:25 IST2018-05-18T05:25:20+5:302018-05-18T05:25:20+5:30
परतूर तालुक्यातील कोकाटे हादगावतांडा येथे मोबाईलचा स्फोट झाल्याने उमेश कैलास राठोड हा दहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

मोबाईलचा स्फोट होऊन मुलगा गंभीर जखमी
आष्टी (जि. जालना) : परतूर तालुक्यातील कोकाटे हादगावतांडा येथे मोबाईलचा स्फोट झाल्याने उमेश कैलास राठोड हा दहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
उमेश दुपारी अडीच वाजता वडिलांच्या मोबाईलवर खेळत असताना अचानक स्फोट झाला. यात त्याच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाली. अंगठ्यासह तीन बोटांना खोलवर जखमा झाल्या. चेहऱ्यावरही दुखापत झाली. वडील कैलास राठोड यांनी त्याला तातडीने खाजगी दवाखान्यात नेले. तिथे प्रथोमपचार केल्यानंतर त्याला जालन्यातील खाजगी रुग्णालयात हलविल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.