आमदार-खासदारांचा यंदा सोशल मीडियावरच गोपाळकाला साजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:48+5:302021-09-02T05:04:48+5:30

जालना : कोरोनातील प्रशासकीय सूचनांचे पालन करीत जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी सणानिमित्तच्या शुभेच्छा फेसबुक, ट्विटरद्वारे देण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यातील ...

MLAs-MPs celebrate Gopalkala on social media only this year! | आमदार-खासदारांचा यंदा सोशल मीडियावरच गोपाळकाला साजरा!

आमदार-खासदारांचा यंदा सोशल मीडियावरच गोपाळकाला साजरा!

जालना : कोरोनातील प्रशासकीय सूचनांचे पालन करीत जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी सणानिमित्तच्या शुभेच्छा फेसबुक, ट्विटरद्वारे देण्यावर भर दिला आहे.

जिल्ह्यातील विविध पक्षाचे बहुतांश लोकप्रतिनिधी प्रशासकीय सूचनांचे पालन करीत सोशल मीडियावर विविध सण, उत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. सर्वजण साधेपणाने सण साजरे करीत आहेत.

टोपेंकडून शुभेच्छा

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. त्यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छाही फेसबुकवरून कार्यकर्त्यांसह नागरिकांना दिल्या आहेत.

गोरंट्यालही सक्रिय

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे सोशल मीडियावर विविध सण- उत्सवाच्या शुभेच्छा देतात. शिवाय केलेल्या कामाची माहितीही ते सोशल मीडियातून देत असतात.

दानवेंकडून सदिच्छा

आमदार संतोष दानवे हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. केलेल्या कामांची माहिती देण्यासह विविध सण, उत्सवाच्या शुभेच्छा ते सोशल मीडियावरून नागरिकांना देतात.

लोणीकरही आघाडीवर

सोशल मीडियाचा वापर करण्यात माजी मंत्री आ. बबनराव लोणीकरही आघाडीवर आहेत. विकास कामे सांगण्यासह सण, क्रीडा क्षेत्रातील यशाच्या सदिच्छाही ते देतात.

राठोडही फेसबुकवर

आमदार राजेश राठोड हे ही फेसबुकसह इतर सोशल मीडियावर सक्रिय असतात. सण, उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासह सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही ते करतात.

कुचे सोशल मीडियावर

बदनापूरचे आमदार नारायण कुचे हे फेसबूकसह इतर सोशल मीडियाचा वापर करतात. सण, उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासह कामांची माहितीही ते सोशल मीडियावरून सतत देतात.

खासदारही

ट्विटरवर ॲक्टिव्ह

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे हे फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. सणाच्या विविध शुभेच्छाही ते येथे देतात.

Web Title: MLAs-MPs celebrate Gopalkala on social media only this year!