शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
2
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
डबलिनला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

उत्साहपूर्ण वातावरणात दिला आरोग्य संवर्धनाचा संदेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:21 AM

सदृढ आरोग्याचा संदेश देणारे वयोवृध्द... महिला, युवक, युवक युवतींसह पुरूषांचा सहभाग... संगिताच्या तलावर थिरकणारे युवक... गुलाबी थंडीत धावण्याचा आनंद लूटण्यासाठी आलेले जालनेकर... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी जालना हाफ मॅरेथॉन पार पडली.

ठळक मुद्देहाफ मॅरेथॉन : महिला, वयोवृध्दांचा उत्साहपूर्ण सहभाग; सदृढ आरोग्याचा दिला संदेश

जालना : सदृढ आरोग्याचा संदेश देणारे वयोवृध्द... महिला, युवक, युवक युवतींसह पुरूषांचा सहभाग... संगिताच्या तलावर थिरकणारे युवक... गुलाबी थंडीत धावण्याचा आनंद लूटण्यासाठी आलेले जालनेकर... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी जालना हाफ मॅरेथॉन पार पडली. यावेळी पदक घेणाऱ्या प्रत्येकाच्या चेहºयावर निर्धारित वेळेत मॅरेथॉन पूर्ण केल्याचा आनंद दिसून आला.जालना हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावटूंशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी मॅरेथॉनचे महत्त्व, त्यासाठी केलेली तयारीचा उलगडा केला. अनेकांनी धावण्याचा आनंद लूटण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. काहींनी प्रथमच तर काहींनी दुसºया वेळेस जालना हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. या शहरात असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडाच्या परंपरेत आता मॅरेथॉनचाही सहभाग झाल्याचे मत अनेकांनी नोंदविले.मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान ठिकठिकाणी धावपटूंसाठी एनर्जल ड्रिंकसह इतर सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महामार्गावरील वाहनांचा धावपटूंना त्रास होऊ नये म्हणून पोलीस दलाच्या वतीने वाहतुकीचे नियंत्रण केले जात होते. शिवाय स्वयंसेवकांनीही या कामी मोठे सहकार्य केले.पुरूषांमध्ये बोंबाले तर महिलांमध्ये गवाते विजयीजालना : जालना शहरात रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष खुल्या गटातून छगन बोंबाले यांनी तर महिला खुल्या गटातून ज्योती गवते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मॅरेथॉनमध्ये सहभागी बालकांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वच धावपटुंचा उत्साह वाखण्याजोगा होता. विशेषत: महिला, युवतींसह वयोवृध्दांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून आरोग्याचा संदेश दिला.विविध गटांमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात हाफ मॅरेथॉन खुल्या पुरूष गटात छगन बोंबाले प्रथम, किरण गावाते द्वितीय, तर विलास गोले तृतीय आले. हाफ मॅरेथॉन खुल्या महिला गटात ज्योती गवाते प्रथम, प्रमिला बाबर द्वितीय तर अश्विनी काटोळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.१० किलोमीटर पुरूष १२ ते ३५ वर्षे वयोगटात किरण मात्रे प्रथम, नितीन टाळीकोटे द्वितीय तर ओम कानेरकर तृतीय आला. १० किलोमीटर पुरूष ३६ ते ५० वर्षे वयोगटात विजयकुमार गुप्ता प्रथम, राम लिंभारे द्वितीय तर अर्जुन जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १० किलोमीटर पुरूष ५१ वर्षे व त्यावरील गटात मोहन्ना पुथियाडियली प्रथम, पंडित सोन्ने द्वितीय तर गजानन राठोड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १० किलोमीटर महिला १२ ते ३५ वर्षे वयोगटात अश्विनी जाधव प्रथम, निकिता मात्रे द्वितीय तर अर्चना आगळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.तर १० किलोमीटर महिला ५१ व त्यावरील वयोगटात माधुरी निमजे प्रथम, अभा सिंग द्वितीय तर रजनी शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

टॅग्स :JalanaजालनाMarathonमॅरेथॉन