चिंचोलीच्या सरपंचपदी मीना शेळके, तर उपसरपंचपदी लक्ष्मण घोलप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:42+5:302021-02-12T04:28:42+5:30
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक पार पडली. यात सरपंचपदी ...

चिंचोलीच्या सरपंचपदी मीना शेळके, तर उपसरपंचपदी लक्ष्मण घोलप
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक पार पडली. यात सरपंचपदी मीना रवींद्र शेळके व उपसरपंचपदी लक्ष्मण घोलप या दोघांचेच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
११ जागांसाठी लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत पॅनलप्रमुख नानासाहेब हिवाळे यांच्या भाजप पुरुस्कृत श्री राजुरेश्वर ग्रामविकास पॅनलने ११ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्ता मिळविली. बुधवारी सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. या वेळी कुशीवर्ताबाई नानासाहेब हिवाळे, सुनीता आत्माराम गाडेकर, शारदा आदबाने, रेखा शेजुळ, लता शेळके, काकासाहेब शेळके, विष्णू गाढे आदी सदस्यांनी मतदान केले. या वेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या प्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.