शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

वास्तविकतेसाठी चिकित्सा महत्त्वाची - आ.ह. साळुंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने स्वत: अनुभव घेत नाही, तो पर्यत ती गोष्ट सत्य आहे, असे मानू नये असे हजारो वर्षापूर्वी भगवान गौतम बुध्दांनी सांगितले आहे. विज्ञानही तेच सांगते, असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंके यांनी केले. गुरुवारी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळ्याला उत्तर देताना केले.जालना येथील आ.ह. साळुंके अमृत महोत्सवी सत्कार समितीकडून या सोहळ्याचे आयोजन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद येथील प्रा. अर्जुन जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. साळुंके म्हणाले की, जालन्याचा आणि माझा संबंध हा फार जुना आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त मी जालन्यात आलो असल्याचे ते म्हणाले. भारतीय संस्कृती, तसेच त्यातील विविधता, विविध धर्म, जातींच्या परंपरा या दोष नसून, ते एक वैभव आहे. त्यामुळेच आपण एकसंघ आहोत. या वेगवेगळ्या परंपरा म्हणजे निसर्गातील विविध रंगांची फुले असल्याचे सांगून त्यांनी याचे महत्त्व विशद केले.भगवान गौतम बुध्द, रवींद्रनाथ टोगोर, चार्वाक, महात्मा बसवेश्वर तसेच संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींच्या प्रेरणेतून गुलामगिरीला नख लावण्याचे काम झाले आहे. संत तुकारामांनी जो विद्रोह केला, त्याचा प्रचार केला जात नसून, त्यांचे चमत्कार सांगितले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.प्रतिकूल परिस्थितीत हताश न होता, त्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज त्यांनी सांगितली. चिकित्सेला महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.वेगवेगळे मतप्रवाह : वाद गुण्या-गोविंदानेच सुटू शकतातदेशात आज अनेक मुद्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. संवाद दुरावत चालला असून, जाती-धर्माच्या नावावर विभागणी होत आहे. या बद्दल आपण १९९० मध्ये एका पुस्तकातून प्रकाश टाकला होता. आज हिंदू आणि मुस्लिमांचे जे वाद आहेत, ते गुण्या गोविंदाने एकत्रित बसूनच सुटू शकतात.कोणीच कोणाला हाकलून देऊन अथवा संहार करून हा प्रश्न न मिटणारा आहे. हल्ली संवादांपेक्षा व्देषाचे राजकारण सुरू असल्याने चिंतेत वाढच होत आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठी सर्वंनी एकत्र येऊन विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. धर्म आणि जातीच्या नावावरील तेढ न शोभणारी आहे.तरूण पिढी भरकटलेली नाहीआजची तरूण पिढी भरकटलेली आहे, असा जो समज पसरवण्यात येत आहे, ते आपल्याला मान्य नाही. आज अनेक युवक-युवती हे चांगले काम करून सत्य आणि वास्तवाची कास धरताना दिसतात. चळवळींच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या चालीरीतींवर आसूड ओढताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांना दिशा देण्यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक