राजकीय अनास्थेमुळे एमबीबीएस महाविद्यालय लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:02+5:302020-12-26T04:25:02+5:30
गेल्याच आठवड्यात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे राज्यातील तीन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यात सातारा, सिंधुदुर्ग ...

राजकीय अनास्थेमुळे एमबीबीएस महाविद्यालय लांबणीवर
गेल्याच आठवड्यात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे राज्यातील तीन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यात सातारा, सिंधुदुर्ग आणि अलीबाग या जिल्ह्यांचा समावेश होता. जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची जागा निश्चीत झाली असती तर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्तावही या जिल्ह्यांसोबत पाठविता आला असता असे सांगण्यात आले. दरम्यान जालना शहराजवळी कुंंभेफळ येथे हे महाविद्यालय उभारणे सोयीचे ठरेल असा अहवाल औरंगाबाद येथील समितीने दिला होता.
चौकट
सिडको प्रकल्पा सारखे होऊ नये
जालन्यात सिडको प्रकल्प हा १२ वर्षापूर्वी तत्कालीन नगरविकास मंत्री राजेश टोपे यांनी मंजूर केला होता. परंतु तो अद्यापही प्रत्यक्षात आला नाही. त्यामुळे जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाचे असे होऊ नये अशी अनेकांची इच्छा आहे.