शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:41 IST

भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. अपघातातील मयत हे औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा येथील रहिवासी आहेत.हमीदखॉ नुरखॉ पठाण (५०) व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खॉ पठाण (३९) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील हमीदखाँ पठाण हे त्यांच्या पत्नीसमवेत रविवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२०- एफ.एन.६८३४) शेकटा येथून बदनापूरकडे जात होते. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर भरधाव खासगी बसने (क्र.जी.एस.०१-सी.आर.६६६६) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील हमीदखाँ नूरखाँ पठाण व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खाँ पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच सपोनि राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी शेख शमशोद्दीन शेख लालमियाँ (रा. शेवगा ता.जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसच्या चालकाविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भिंगाळे हे करीत आहेत. पठाण दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.दुचाकीसाठी वेगळा मार्गच नाहीजालना-औरंगाबाद महामार्ग बनविताना दुचाकीचा विचार करण्यात आलेला नाही. या महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असून, दुचाकीस्वारांचीही संख्या अधिक आहे. परिणामी झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक