Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:18 IST2018-08-02T17:17:55+5:302018-08-02T17:18:37+5:30
घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथील नामदेव चंद्रभान गरड (वय 30) या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी मध्यरात्री विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
जालना : घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथील नामदेव चंद्रभान गरड (वय 30) या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी मध्यरात्री विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जालना येथे सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मराठा आरक्षणाबाबत राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. यातच औरंगाबाद येथील कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जीव दिला. यानंतर राज्यभरात अशा घटना झाल्या. मराठवाड्यात औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात तरुणांनी जीव दिला. जालना जिल्ह्यात बुधवारी रात्री घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथील नामदेव चंद्रभान गरड या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.